चिञकला विषयातील करिअरच्या विविध संधी
आकाशवाणी वरुन महादेव खळुरे यांचे विद्यार्थी व पालकांसाठी सुसंवाद
अहमदपूर (गोविंद काळे) : चित्रकला विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध संधी कसे आहेत.या विषयावर आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावरुन दि.3 जूलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता बालमंडळ या कार्यक्रमात पालक व विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षक महादेव खळुरे यांचा सुसंवाद. लाँकडाऊन काळात आँनलाईन माहिती मिळावे. कलेतील आवश्यक गोष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावेत यासाठी आँल इंडिया रेडिओ हे एक प्रभावी श्राव्य माध्यम आहे. त्यावरुन लाखो विद्यार्थ्यांना विविध विषयाची माहिती मिळते.
दहावीनंतर चित्रकला विषयात फाईन आर्ट या शाखेतील डिप्लोमा कोर्स केल्यास पुढे अनेक व्यावसायिक कोर्स करुन करिअर घडविता येते. एखाद्या विद्यार्थ्याला कलेची आवड आहे व तो इंटरमिजिएट ही चित्रकला परीक्षा उत्तीर्ण आहे. अशा विद्यार्थ्यांना चित्रकला क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.तसेच बारावी नंतर सुद्धा कला क्षेत्रात अनेक संधी आहेत. कला विषयाचे माहिती विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी यशवंत विद्यालयातील कला शिक्षक खळुरे हे सतत प्रयत्नशील असतात. आकाशवाणीवरुन विद्यार्थ्यांना साधलेल्या संवादाबद्दल खळुरे यांचे संस्थेचे सचिव शिक्षणमहर्षी, डी बी लोहारे गुरुजी मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलिप गुळवे आदिनी अभिनंदन केले.