आ रमेशआप्पा कराड यांनी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट

आ रमेशआप्पा कराड यांनी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. लातूर ग्रामीण मतदारसंघात रेल्वे बोगी चा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्या अनुषंगाने व इतर लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग कशा पद्धतीने सुरू करता येतील या सह विविध विषयावर ना राणे आणि आ कराड यांच्यात चर्चा झाली. याप्रसंगी आ रमेशआप्पा कराड यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोककाका केंद्रे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड लातूरचे उद्योजक जगदीश कुलकर्णी आदी होते

About The Author

error: Content is protected !!