क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चे दहावी सी बी एस इ निकालात यश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अहमदपूर शिरूर ताजबंद राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव शिवारा मधील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या सीबीएसइ बोर्डामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. अधिक माहिती अशी की येथील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षीच्या निकालांमध्ये शाळेने आपला दबदबा निर्माण केला आहे शाळेतील विद्यार्थी वैभव केशव तिडके या विद्यार्थ्यांनी 97.17 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला तसेच शाळेतील 95% च्या वर एकूण तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये एकूण 18 विद्यार्थ्यांनी 90 टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर 33 विद्यार्थी 80 टक्के च्यावर गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर 5 विद्यार्थ्यांनी 70% च्या वर गुण घेऊन यश संपादन केले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. जीवनकुमारजी मद्देवाड, प्रशासक रितू जीवनकुमार मद्देवाड, प्राचार्य महेंद्र पांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यालयातील एकूण ५६ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यापैकी मेरिटमध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण, विशेष प्राविण्याने ३३ विद्यार्थी उत्तीर्ण, प्रथम श्रेणीमध्ये ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विषयानुसार सरासरी निकाल पाहता मराठी ९८, आयटी ९४, गणित ९०, हिंदी ९०,इंग्लिश ८६, तर सोशल सायन्स ८७, सायन्स ८० असा आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी विषयाने बाजी मारली. विद्यार्थ्यांना शाळेच्या पर्यवेक्षिका सुधाराणी केशव, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, विषय शिक्षक गौरीशंकर पाल, अक्षय कांबळे,अलिसया गोमांगो आदींचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीक कोअॉर्डीनेटर टिजो जॉन्सन, शिला क्लॅन्सी व संदीप दुबे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
