मैत्री दिना निमित्त पूरग्रस्तांना मदत व नेत्रदानाचा संकल्प

मैत्री दिना निमित्त पूरग्रस्तांना मदत व नेत्रदानाचा संकल्प

उदगीर (प्रतिनिधी) : इन्नरव्हील क्लब, उदगीर च्या वतीने मैत्र दिवशी इन्नरव्हील क्लब ने फ्रेंडशीप बँड  बांधुन व केक कापून फ्रेंडशीप डे साजरा केला. तसेच या दिवशी इन्नरव्हील क्लब च्या 17 सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला व नेत्रदानासाठीचे पत्रक भरुन दिले. अध्यक्षा सौ. मीरा चंबुले,सचिव शिल्पा बंड़े, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, सहसचिव निलिमा पारसेवार, संपादक पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार व इतर सदस्य शंकूंतला पाटिल, आशा घोणसीकर, जयश्री गुरमे,दिपा अंबेसंगे, दिपा कुलकर्णी, स्वाती जेठुरे, आशा देवणे, डॉ. सविता पदातुरे या सर्व सदस्यांनी नेत्रदानाचा स़ंकल्प करून विशेष सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट प्रमुख मानसी चन्नावार होत्या. तसेच पुरग्रस्तांसाठी मदत निधीही जमा करण्यात आला 10,000 रु चा निधी जमा करुन पाठवण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!