आईचे वर्षश्राद्ध; २१ मुलींचे शैक्षणिक शुल्क भरून अनोख्या पद्धतीने केले साजरे

आईचे वर्षश्राद्ध; २१ मुलींचे शैक्षणिक शुल्क भरून अनोख्या पद्धतीने केले साजरे

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांच्या मातोश्री स्वर्गीय चंप्पाबाई नामदेव नागरगोजे यांचे मौजे महाळंग्रावाडी येथे वृद्धापकाळाने दि.14 जुलै 2020 रोजी दुःखद निधन झाले होते. तिथीनुसार वर्षश्राद्ध रविवार दि.01 आगस्ट 2021 रोजी पारंपरिक पद्धतीने पुजन करून साजरे केले.या कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या गरजू व होतकरू अशा एक्केवीस विद्यार्थिनींचे वार्षिक शैक्षणिक शुल्क डॉ.दिलीप नागरगोजे व सौ.रेश्मा नागरगोजे यांनी जमा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्षश्राद् साजरे केले. सदरील 21 विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क 17241 रुपये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, व्यंकट नागरगोजे, चि.श्रीनिवास व चि.ओम नागरगोजे ज्ञानोबा गिते, रविकुमार मुंडे, सौ.वर्षा मुंडे, नात राजनंदिनी, रत्नाकर माने, किशोर राजमाने, प्रा.शशीकांत स्वामी, प्रा.महेश जंगापल्ले आदी उपस्थित होते. डॉ.दिलीप नागरगोजे यांच्या उपक्रमाचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, शालेय समिती अध्यक्ष मा.ललितभाई शाह, संयुक्त सचिव सुरेशजी जैन यांनी कौतुक केले.

About The Author