महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त हिंदी पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने तसेच स्कुल कनेक्ट कार्यक्रम अंतर्गत हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विरभद्र बिरादार उपस्थित होते. मंचावर विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे, प्रा. रवि कांबळे, प्रा. कुंभार, डॉ. राहुल अल्लापूरे, बाबूराव माशाळकर, प्रा. डॉ. वि. पी. चनाळे व प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा आनंद बोडके याने प्रथम क्रमांक मिळवून पंधराशे रुपये रोख व प्रमाणपत्र प्राप्त केले, द्वितीय क्रमांकावर श्री हावगीस्वामी महाविद्यालयाची सय्यद सानिया हिने एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र मिळविले, तर तृतीय क्रमांक धावडे अमीर आली उस्मान आली आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची सय्यद निषाद यांना संयुक्तपणे देण्यात आला असून प्रत्येकी पाचशे रुपये रोख व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर व प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुंजाळ सुमित्रा यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. विनोद चनाळे यांनी केले.
