बोरगाव येथे मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने अन्नधान्याचे वाटप
उदगीर (एल.पी. उगिले) येथील काँग्रेस पक्षाचे नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकरराव एकुरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बोरगाव येथे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक नितीन एकुरकेकर, सुशील मादळे, आनंद उपाध्ये, आशिष कोकणे, मधुकर कांबळे, कार्तिक कांबळे, सुनील स्वामी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना आज तगायत सरसकट पंचनामे झाली नसून, भरपाई मिळाली नसल्याचे बोलून दाखवले. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. राजकीय नेते येऊन भाषण करून निघून जातात, साध्य काहीच होत नाही.अशी खंत ही यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने 200 किट्सचे वाटप करण्यात आले. येणाऱ्या काळात कोणतीही अडचण पडल्यास मानवाधिकार संरक्षण समिती आपल्या सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीशी आहे. असे यावेळी नितीन एकुरगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
