छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलाच्या परीसरात १०९ वृक्षांचे वृक्षारोपण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अतिष आकडे , डॉ. विश्वनाथ भालेराव , डॉ. हरीभाऊ ढगे तसेच एन.सी.सी.चे प्रमुख डॉ. बालाजी सूर्यवंशी , डॉ. विष्णू पवार , डॉ .टेकाळे अनंत ,डॉ. विजयकुमार जाधव , डॉ. संजय निटुरे , डॉ. शेख एम.एन.,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.पी. गिरी उपस्थित होते. वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व एन.सी. सी. कॅडेट्स यांनी प्रयत्न केले .
