पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जी.प.प्रा.शाळेत फळवाटप कार्यक्रम उत्साहात

0
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जी.प.प्रा.शाळेत फळवाटप कार्यक्रम उत्साहात

उदगीर (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर जि.प. प्राथमिक शाळेत बुधवारी भाजपा महिला मोर्चा च्या हाळी हंडरगुळी मंडळाच्या तालुका अध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी फळवाटप व मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चा च्या लातूर जिल्हा अध्यक्षा श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, सरपंच अंबिका पवार, उपसरपंच अमित माडे, विदेश पाटील, सुभाष राठोड, मुख्याध्यापक श्रीमती पंचगले एस.व्ही., कळसकर एस.आर., श्रीमती कांबळे ज.बी., जाधव एस.आर., श्रीमती झोले जे.बी., सय्यद आर. आर., श्रीमती कांबळे डी. बी., मंगल चिलके, सीमा सुर्यवंशी, सविता चव्हाण, महानंदा केंद्रे, ललीता शिवनगे, पुष्पा श्रीवास्तव, शोभा फड, सर्व शिक्षकवृंद, पालक प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य/सदस्या तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली, तसेच पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित छोटेखानी माहितीपर भाषण सादर करून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
या प्रसंगी बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आहाराचे महत्त्व सांगितले. “फळे-भाज्या नियमित खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. आज पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिलेले फळ हे विद्यार्थ्यांनी केवळ एक भेट म्हणून नव्हे तर आरोग्याचा पाया म्हणून स्वीकारावे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम पाटील (आडे) यांनी केले, तर आभार प्रदर्शन कळसकर एस. आर. यांनी केले. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत पंतप्रधानांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!