मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय निवृत्तीराव रेड्डी यांना अभिवादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अहमदपूर-चाकूर मतदारसंघाचे पहिले आमदार आणि स्वातंत्र्य सैनिक, स्वर्गीय निवृत्तीराव रेड्डी यांना आदरांजली वाहण्यात आली. अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नरेंद्र रेड्डी, वीरेंद्र रेड्डी, भारत दादा रेड्डी, डॉ. वैभव रेड्डी, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, मनसे जिल्हाप्रमुख नरसिंह भिकाने, मानखेडचे सरपंच नारागुडे, उपनगराध्यक्ष अमित रेड्डी आणि काजळ हिप्परगाचे सरपंच प्रवीण दादा रेड्डी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला उजाळा दिला.
यावेळी नगरसेवक बालाजी प्रकाश पाटील (आगलावे), सोसायटी संचालक राजकुमार रेड्डी, अजिंक्य भारतराव चामे, रुकुजी बेंबडे, शेख नबी, दिलीप आरदवाड, प्रतिका रेड्डी, अतुल रेड्डी, अभिजीत रेड्डी आदींसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
उपस्थितांनी स्वर्गीय निवृत्तीराव रेड्डी यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या योगदानाला अभिवादन केले. हा कार्यक्रम मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचे स्मरण आणि स्वातंत्र्य सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
