एम. कॉमची विद्यार्थिनी प्रीती नागनाथ कारभारी विद्यापीठातून सर्वप्रथम
उदगीर (एल पी उगीले) येथील
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील एम कॉम ची विद्यार्थिनी प्रीती नागनाथ कारभारी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने घेतलेल्या उन्हाळी 2025 च्या परीक्षेत 87.70 टक्के गुण मिळवून विद्यापीठातून सर्वप्रथम आली. महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम राखत सुवर्णपदक मिळवून तिने महाविद्यालयाच्या सन्मानात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवलेला आहे. 20 सप्टेंबर 2025 रोजी 28 व्या दीक्षांत समारंभामध्ये तिला विद्यापीठाच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते तिचा व तिच्या पालकाचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे, सर्व कार्यकारणी सदस्य, वाणिज्य विद्याशाखेचे विभाग प्रमुख प्रो. डॉ.ह .वा.कुलकर्णी .प्रो डॉ. डी. बी. कोनाले .प्रा.संतोष खरात.प्रा.सौ.मयुरी चिवटे प्रा.राजेश पवार .प्रा.गणेश बेद्रे .प्रा. श्रुती चिंतलघट प्रा अंजली पाटील,डॉ.विष्णू पवार,प्रबंधक बालाजी पाटील,बापुरे सतीश या सर्वांनी अभिनंदन केले. प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे व तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
