उदयगिरीत रांगोळीतून साकारले सूक्ष्मजीवांचे विश्व

0
उदयगिरीत रांगोळीतून साकारले सूक्ष्मजीवांचे विश्व

उदगीर (प्रतिनिधी)येथील उदयगिरी महाविद्यालयात जागतिक सूक्ष्मजीव दिनानिमित्त, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 18 व 19 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमात निबंध लेखन, रांगोळी, कविता वाचन, भित्तिपत्रक, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात एकूण 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते, तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. मनीषा पाटेकर होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करून भविष्यात संशोधक म्हणून समाज कल्याणासाठी योगदान देण्याचा संदेश दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. आर. एन. लखोटिया यांनी विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि अशा स्पर्धांमध्ये सहभागाबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळण्याची प्रेरणा दिली. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षिता जाधव व प्राजक्ता बिरादार यांनी केले तर कु. ऋतुजा मलिशे यांनी आभार व्यक्त केले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. आलापुरे, प्रा. डॉ. शैलेश ममदापुरे, प्रा. अश्विनी भाताडे, डॉ. सबिना शेख, प्रा. डॉ. सिद्धेश्वर लांडगे व प्रा. एस. जी. हाश्मी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!