उदयगिरी महाविद्यालयात उर्दू बैतबाजी
उदगीर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्कुल कनेक्ट उपक्रमांतर्गत उर्दू विभागाच्या वतीने उर्दू बैतबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.आर. के. मस्के तर प्रमुख पाहुणे डॉ. शेख मोहम्मद साबेर, मुख्याध्यापक मौलाना अबुल कलाम उर्दू आणि सेमी इंग्रजी विद्यालय उदगीर हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, विभागप्रमुख डॉ. हमीद अश्रफ , प्रा. डॉ. एम. पी. मानकरी, प्रा. डॉ. एस. ए. मुळे, प्रा. डॉ. एस. जी. अन्सारी,प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करून रसिकांचे मन जिंकले. स्पर्धेमध्ये प्रमुख्याने शेख मुन्ताजिब, शेख अब्दुल रहीम, तंबोळी रझिया, पठाण इरशाद, पठाण आसिया, कुरेशी अर्सलान, हाशमी जुबैर, पठाण वाजिद, बागबान सादिया, शेख हीना, शेख सादफ, शेख जवाद, शेख नुसरत, शेख निशात, शेख अमेना, शेख नाजिया, पठाण सफिया या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उर्दू काव्यप्रेम आणि साहित्यिक परंपरेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. प्रमुख उपस्थितांनी विद्यार्थ्यांची मुक्त प्रशंसा करत उर्दू भाषेची समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व सांगितले.
