जनमाता देवस्थान साठी लागेल तेवढा निधी देणार – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

0
जनमाता देवस्थान साठी लागेल तेवढा निधी देणार - सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

चाकूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील आई जनमाता देवस्थानसाठी लागेल तेवढा निधी देऊन मंदिराचा विकास घडवून आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथे केले .
मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील खुर्दळी येथे येथील आई जनमाता देवस्थानची घटस्थापना सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजप नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, , शिवाजीराव काळे, भानुदासराव पोटे, यशवंतराव जाधव, दयानंदराव सुरवसे, सरपंच प्रचिताताई भोसले, दैनिक सकाळचे पत्रकार विकास गाढवे, ॲड. संतोष गंभीरे, अनिलराव वाडकर, अशोकराव कर्डिले, संदीप शेटे, संगम जनगावे, ॲड. श्रीनाथ सावंत, विवेकानंद शिंदे, शशिकांत शिंदे, कासिम भाई पटेल, जलीलसाब पटेल, बाबुभाई दिवाणजी, अलीम पटेल, अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव, पांडुरंग शिंदे, अमर पाटील तसेच हाळी खुर्द गावचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. बाबासाहेब पाटील म्हणाले की, आई जनमाता मंदिराचे महत्व अनादी काळापासून आहे. मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची प्रार्थना आई जनमाता कडे करणार असल्याचे सहकार मंत्री ना. पाटील म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!