स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तीसाठी चळवळ उभा केली – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

0
स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तीसाठी चळवळ उभा केली - सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

देवर्जन ( गोविंद काळे ) मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसाठी चळवळ उभा केली म्हणूनच आपण आज स्वातंत्र्य पाहत आहोत असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी देवर्जंन तालुका उदगीर येथे केले.
देवर्जन तालुका उदगीर येथे स्वातंत्र सैनिक गंगाधरराव पाटील साकोळकर यांच्या व्यक्ती व कार्य या मराठी व इंग्रजी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब जाधव , खासदार शिवाजीराव काळगे, आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील सेलुकर, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माजी आ.मनोहरराव पटवारी, मारोती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्यामराव भोसले, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी चेअरमन शिलाताई पाटील, माजी संचालक संभाजीराव सुळे, श्रीमती अर्चनाताई पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. विशंभरराव गुणाले, माजी महापौर ॲड. दिपकराव सुळ, शिवाजीराव साकोळकर, सगरे सर, विठ्ठलराव पाटील, डी.आर मुकदम, सचिन दाताळ, धनाजी मुळे पाटील, शिवाजीराव मुळे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, प्रितीताई भोसले, मन्मथआप्पा किडे, शिवाजीराव हुडे, गुरुनाथ बेळे, बालाजीराव भोसले, मुन्ना पाटील, कल्याणराव पाटील, श्रीकांत पाटील, शिवाजीराव साकोळकर, ॲड. विजय साकोळकर, प्रा. ओमप्रकाश साकोळकर सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, देवर्जन हे गाव स्वातंत्र सैनिकांचे असून,या गावाने मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात बलिदान दिले आहे. आज आपण जे सोनेरी दिवस पाहतो ते फक्त स्वातंत्र्य सैनिकांमुळेच पहात आहोत. देशाचा विकास करायचा असेल तर खेड्याचा विकास करणे आवश्यक्य असून, त्या दृष्टीने सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले.
तसेच राज्याच्या अनेक नेत्यांनी सहकाराकडे लक्ष दिले आता त्यांचाच वारसा चालवण्याची संधी मला असून मी सुद्धा मराठवाडा आणि विदर्भाकडे सहकार कसे वाढेल याकडे लक्ष देणार आहे. सोसायटीची संगणीकरण प्राधान्यने करून सहकार चळवळ रुजवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे ना. पाटील म्हणाले.
यावेळी अर्चनाताई पाटील चाकूरकर, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार संजय बनसोडे यांनी मनोगते व्यक्त केली तर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!