आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील
चाकूर ( गोविंद काळे ) सर्वांनी आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले..
चाकूर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वस्थ नारी, सशक्त नारी अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, जिल्हा शैल्य चिकित्सक प्रदीप ठेले, आर.एम.ओ डॉ.अशोक सारडा, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. विवेक खुळे, जितेन जयस्वाल, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, नितीन रेड्डी, पपन कांबळे, डॉ. एम.जी मिर्झा, रविभाऊ कुलकर्णी, शिवदर्शन स्वामी, रामभाऊ कसबे, भागवत फुले, नरसिंग गोलावार, गंगाधरआप्पा अक्कानरू, सिद्धेश्वर आप्पा अंकलकोटे, गणपत महाराज नितळे, मधुकरराव मुंडे, संदीप शेटे, अनिलराव वाडकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की आरोग्याची काळजी घेत असताना स्वच्छता ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा आहे. ग्रामीण रुग्णालयाला आम्ही मागील रुग्णवाहिका दिल्या. सरकार मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत करत असून सरकार सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवत आहेत आपण त्या सर्व योजनेचा लाभ घेतला पाहिजे. आपल्याला कॅन्सर या रोगाची भीती वाटत असते मात्र आता यावर सुद्धा अत्याधुनिक असे उपचार पद्धती आल्यामुळे कॅन्सरवर सुद्धा आता आपल्याला मात करता येते. शासनाने हे शिबिर महिला सशक्त राहिली पाहिजे यासाठी आयोजित केले आहे. प्रशासनाने या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सुद्धा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी केले. कार्यक्रमास सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक जितेन जैस्वाल यांनी केले. या कार्यक्रमास तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला व तालुक्यातील वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते…
