किलबिल नॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
किलबिल नॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

अहमदपूर: ( गोविंद काळे )
जिल्हा क्रीडा परिषद लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हा स्तरीय सॉफ्टटेनिस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यास्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटात 3 विद्यार्थ्याचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यात पवन विलास सूर्यवंशी, चंद्रमणी धरमसिंग शिराळे,तर 14 वर्षे वयोगटामध्ये कृष्णा दीपक श्रीरामे या 3 खेळाडूची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक कासीम शेख,मोसीन शेख, विशाल सरवदे, दत्तात्रय गिरी, यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशा बद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!