किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न….

0
किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न….

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेत नुकतीच विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली . सदरील नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्रमुख पाहुणे म्हणून ओम गॅस एजन्सी चे संचालक महेंद्र खंडागळे, माजी जि प सदस्य देवानंद मुळे, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा डॉ रोहिदास कदम, रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिरादार, सचिव धीरेंद्र ढेले,प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी दशेत निवडणूक प्रक्रिया काय असते आपले प्रतिनिधी कसे निवडले जातात याची प्रत्यक्षात माहिती मिळण्यासाठी शाळेने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी सांसद निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यामधे एकूण 74 उमेदवार रिंगणात उतरले होते. आपण निवडून आल्यानंतर कोणती कामे करणार आहोत याची माहिती सदरील उमेदवारांनी त्यांना प्रचारासाठी दिलेल्या दोन दिवसात विद्यार्थ्यांसमोर ती मांडली. या संपूर्ण निवडणुकीत शाळेचा हेड बॉय म्हणून राज ढोकाडे याने 209 मते तर हेड गर्ल क्षितिजा पाटील हिने 176 मते घेऊन निवडणूक जिंकली तर डेप्युटी हेड बॉय म्हणून सत्यम स्वामी व डेप्युटी हेड गर्ल म्हणून श्रावणी कदम यांनी निवडणूक जिंकली. शाळेमध्ये असलेल्या चार हाउस च्या निवडणुकीत मुलींमधून कॅप्टन म्हणून संजीवनी मुंडे,आर्या साकोळे, आर्या बयास,वैभवी मुळे तर मुलांमधून नितीन मिरजगावे, रेहान शेख,राजवीर जाधव, कृष्णा श्रीरामे यांनी निवडणूक जिंकली तर व्हॉईस कॅप्टन म्हणून प्राची भालेराव,जागृती चव्हाण,विधी भुतडा,आनंदी देशमुख व मुलांमधून अरहान पठाण, उमर सय्यद ,प्रथमेश मुसळे,व्यंकटेश सूर्यवंशी आदींनी निवडणूक जिंकली. तसेच शाळेचे असेम्ब्ली इन्चार्ज म्हणून सूफियान खुरेशी, गुणिका तोष्णीवाल,स्पोर्ट हेड हुसेन खान पठाण, दिव्या श्रीरामे, कल्चरल हेड प्रेम माने, मानवी येणगे, डिसिप्लिन इंचार्ज मधुरा सुडे व ओमकार भगत यांची निवड झाली.याप्रसंगी मान्यवरांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे यांनी केले तर आभार शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता नागरगोजे व गौरवी अबरबंडे यांनी केले. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत वलांडे यांनी व त्यांच्या टीम ने अतिशय पारदर्शक भूमिका बजावली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक ,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!