ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांना ‘ नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५’ जाहीर

0
ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांना ' नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५' जाहीर

अहमदपूर, ( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर माणिकराव इंगळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब तर्फे देण्यात येणारा ‘नेशन बिल्डर अवार्ड २०२५’ नुकताच जाहीर झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महात्मा फुले महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात महत्त्वाचे योगदान देणारे तसेच डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून ई – ग्रंथालय सुरू करणारे संशोधन वृत्तीचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर माणिकराव इंगळे यांना रोटरी क्लब अहमदपूर च्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५’ नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती अहमदपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. कपिल बिरादार,सचिव रो. धीरेंद्र ढेले , लिटर्सी डायरेक्टर रो. नरसिंग चिलकावार, प्रोजेक्ट चेअरमन रो. ज्ञानोबा भोसले व रोटरी क्लबच्या सदस्यांनी दिली असून रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रा.इंगळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
याबद्दल ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तसेच हा अवार्ड जाहिर बद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी. टी. शिंदे, ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव झोडगे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकार्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!