महात्मा फुले महाविद्यालयात उद्या’ रानभाजी ‘ महोत्सवाचे आयोजन

0
महात्मा फुले महाविद्यालयात उद्या' रानभाजी ' महोत्सवाचे आयोजन

अहमदपूर, ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आय.क्यु. ए.सी. अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अहमदपूर तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सोमवारी दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फुलें महोत्सवासह विविध विषयावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले असून सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवात तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या रानभाजी महोत्सवात तोंडले, शेपु , चुका, दोडका, बटाटा ,गवारी, पान गोबी, दिलपसंद , ढोबळी मिरची, भेंडी , मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग,मोड आलेला हरभरा, सिमला मिरची, करटुले, तांदूळ कुंजर, कारले,शेवगा, कडीपत्ता, आवरा , खिरा पांढरी काकडी, मुळा, कोथिंबीर, चमकुरा ,तरवटा , पालक ,मेथी, टमाटा , काकडी, फुलकोबी, वांगे, चवळी, पडवळ, पातीचा कांदा, साधी मिरची, कदु ,घोळ यासह विविध प्रकारचे भोपळे आदींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या विविध रानभाज्यांचा आपल्या आरोग्यसाठी होणारा उपयोग यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी अहमदपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यचा लाभ घ्यावा असे असे आवाहन प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील आदींनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!