स्वातंत्र्याच्या आंदोलनात हिंदी भाषेचे मोलाचे योगदान : डॉ. पांडुरंग चिलगर
माहूर, ( गोविंद काळे ) –
“हिंदीने जनतेला स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी एकत्र आणण्याचे कार्य केले. हिंदी भाषेतील साहित्य, वृत्तपत्रे व क्रांतिकारकांचे लेखन यामुळे स्वराज्याची जाज्वल्य भावना घराघरांत पोहोचली.” असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर व्यक्त केले. ते बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीक्षेत्र माहूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या रजत महोत्सवी वर्ष व हिंदी दिवसाचे औचित्य साधून ‘स्वाधीनता आंदोलन में हिंदी भाषा का योगदान’ या विषयावर १६ सप्टेंबर प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, उपप्राचार्यद्वय प्रो. राजेंद्र लोणे, डॉ महिनाज मुजेवार व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ दिनेश व्हिजीगिरी उपस्थित होते.
बळीराम पाटील मिशन, मांडवीचे अध्यक्ष श्री. प्रफुल्लजी राठोड व सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य पाटील यांनी हिंदी भाषेने दिलेली सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेची शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ माधव जोशी यांनी केले तर प्रास्ताविक डॉ विलास राठोड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. संजय चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने
करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
