नेता असावा तर असा ; वडनेरच्या पुरात खासदार ओमराजे निंबाळकरांनी दाखवला माणुसकीचा झरा!
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर( गोविंद काळे ) परंडा तालुक्यातील वडनेर गावात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि पुराच्या पाण्यात उतरून मदत केली. त्यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कृतीमुळे ‘नेता असावा तर असा’ असे गौरव उद्गार काढत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
काल रात्री २ वाजल्यापासून वडनेरमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. एका घरात अडकलेल्या कुटुंबाला (एक आजी, २ वर्षांचा मुलगा व २ व्यक्ती) वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीमसोबत खासदार निंबाळकर स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केवळ सूचना देण्याचे काम केले नाही, तर अक्षरशः पुराच्या पाण्यात उतरून बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
जवळपास १८ तास चाललेल्या या बचावकार्यात अथक प्रयत्नांनंतर आज संध्याकाळी ८ वाजता हे कुटुंब सुरक्षित बाहेर आले. खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील या बचावकार्यात एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाची साथ दिली.
’प्रत्येक संकटात सामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणारा नेता’
खासदार निंबाळकर यांच्या या कृतीतून त्यांनी केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर एक संवेदनशील माणूस म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना वाढली आहे.
