जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी किलबिलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड…..

0
जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी किलबिलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड…..

अहमदपूर( गोविंद काळे )
शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथील क्रीडांगणावर दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी नुकत्याच तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. सदरील स्पर्धेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल शाळेचा अथर्व धर्मेंद्र भोसले या विद्यार्थ्यांनी 14 वर्षे वयोगटात उंच उडी व लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले तसेच 100 मीटर रनिंग व गोळा फेक स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात कृष्णा दीपक श्रीरामे तर 400 मीटर रनिंग स्पर्धेत शेकडे विश्वजीत विनोद व 200 मीटर रनिंग स्पर्धेत कार्तिकी केशव जायभाय या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळविला. तर 200 मीटर रनिंग स्पर्धेत शेख हुजेफ जिलानी याने द्वितीय क्रमांक मिळाला यासोबतच 17 वर्षे वयोगटात उंच उडी स्पर्धेत यश शिवकुमार भुरे प्रथम तर चाटे विश्वास बळीराम द्वितीय क्रमांक घेऊन त्यांनी यश संपादन केले तर लांब उडी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात मुंडे रुद्र उमेश यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सदरील सर्व विद्यार्थ्यांची लातूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय गिरी, कासिम शेख, विशाल सरवदे, मोसिन शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!