सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना ‘रोटरी भूषण पुरस्कार’ प्रदान; म्हणाले – हा पुरस्कार कायम स्मरणात राहील

0
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना 'रोटरी भूषण पुरस्कार' प्रदान; म्हणाले - हा पुरस्कार कायम स्मरणात राहील

​अहमदपूर ( गोविंद काळे ) राज्याचे सहकार मंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना अहमदपूर येथील रोटरी क्लबच्या वतीने ‘रोटरी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आपल्याच माणसांनी दिल्याने तो अधिक हृदयस्पर्शी वाटतो आणि कायम स्मरणात राहील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
​अहमदपूर येथील ‘किलबिल इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिराजदार होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे सचिव प्रदीप ढेले, उपप्रांतपाल चंद्रशेखर मुळे, किलबिल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ज्ञानोबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवानंद हेंगणे आणि महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​रोटरीचे काम मोठे
​पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ना. पाटील म्हणाले की, रोटरी क्लबशी माझे जुने नाते आहे. रोटरी समाजामध्ये चांगल्या कामांना प्रोत्साहन देते आणि त्यांचे कार्य अत्यंत मोठे आहे. त्यामुळे, ‘रोटरी भूषण पुरस्कार’ मिळाल्याचा मला विशेष आनंद आहे.
​याच कार्यक्रमात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अहमदपूर तालुक्यातील २२ व्यक्तींना ‘राष्ट्र शिल्पकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिराजदार यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल चवळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!