ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे उदगीर शिवसेनेचा धडक मोर्चा

0
ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे उदगीर शिवसेनेचा धडक मोर्चा

उदगीर (एल पी उगीले)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/- रुपये अनुदान द्यावे, व उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे बोरगाव, धडकनाळ या गावाचे पुनर्वसन करावे,तसेच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची फिस माफ करावी, मागील ऑगस्ट महिन्यापासून आजपर्यंत सरासरी पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे कापूस, तूर, उडीद, ज्वारी, सोयाबीन या मुख्य पिकासह अन्य पिकाचे रोज पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करण्याचे काम केले आहे.
तरी शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/- रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याच्या बांधावर मोफत खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे. उदगीर तालूका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मोरे, शिक्षक सेना सचिन साबणे,प्रकाश हैबतपुरे, तालुका समन्व्यक व्यंकट साबणे,शहर प्रमुख बालाजी सोनाळे,उप तालुका प्रमुख महेश फुले,तालुका सचिव अरुण बिरादार,अशोक भुरे,शिवकांत चटणाले,राहुल जाधव,संजय मटपती, मुन्ना पांचाळ, विलास बिरादार,विलास हैभतपुरे,बंटी घोरपडे,प्रमोद माने, विभाग प्रमुख शिवा मुरळीकर, परशुराम विभुते, बालाजी डोंगरे,दत्ता पतंगे, मनोज फुले, बाळू पाटील, माधव जाधव,बिरादार,संगम सोनटक्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!