ओला दुष्काळ जाहीर करा संभाजी ब्रिगेडची मागणी
उदगीर (एल पी उगीले) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. यासह हेक्टरी मदत वाढवा, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज त्वरित द्या, पिक विमा त्वरित मंजूर करा, शेतकऱ्यांना शेती साहित्य 100% अनुदानावर द्या, पशुधनासाठी प्रति जनावर तीन हजार रुपये महिना देण्यात यावे, कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल आम्ही भाव द्यावा. इत्यादी मागण्याचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकट आली असून यातून शेतकऱ्यांना वाचवण्याची अत्यंत गरज आहे. व ओला दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे. कारण शेतकऱ्याचे हाताला आलेले सर्वच पीक नष्ट झाले आहे. तसेच पशुधन, घरे, शेतीचे साहित्य वाहून गेलेले आहेत, त्यामुळे शेतकरी निसर्गपुढे हातबल झालेला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उद्रेक होऊन,’ न भूतो न भविष्यती’ अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला उभा करण्याचे काम शासनाने व प्रशासनाने केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेडच्या व शेतकऱ्याच्या वतीने प्रमुख मागण्या.संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा.,शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 60,000 .रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे.,शेतकऱ्याचे तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज त्वरित माफ करण्यात यावे., पिक विमा मंजूर करण्यात यावा. सोयाबीनला प्रतिक्विंटल 10,000 . रुपये व कापसाला 12,000 .रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात यावा., शेतकऱ्यांना शेती साहित्य 100% अनुदानावर देण्यात यावे.,पुरामुळे खसून गेलेल्या जमिनी शासनाकडून मोफत दुरुस्त करण्यात याव्यात., पशुधनासाठी प्रति जनावरासाठी महिना 3,000. रुपये देण्यात यावे.
या वरील मागण्या मान्य न केल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्याच्या वतीने महाराष्ट्र बंद व संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलने करण्यात येतील. यापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील.सरकारला जबाबदार धरून ,मनुष्य वधाचे, शेतकऱ्याच्या आत्महत्येचे, गुन्हे सरकारवर नोंदवण्यात येतील. याची सरकारने त्वरित दखल घेऊन निवेदनात दिलेल्या मागण्या मान्य कराव्यात ,असे संभाजी ब्रिगेडकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे.
मजूर प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
