विराळ येथिल मोफत सर्वरोग शिबीरात १६५ रुग्णांची तपासणी,डाॅ. माधव चंबुले यांनी घेतले विराळ गाव दत्तक

0
विराळ येथिल मोफत सर्वरोग शिबीरात १६५ रुग्णांची तपासणी,डाॅ. माधव चंबुले यांनी घेतले विराळ गाव दत्तक

उदगीर (एल पी उगिले), येथील
रंगकर्मी प्रतिष्ठान आणि उदयगिरी हाॅस्पीटल उदगीर, साई हॉस्पिटल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने विराळ ता. जळकोट मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात १५६रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन डाॅ. माधव चंबुले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सरंपच संतोष पवार,बळीराम सोनटक्के,श्री समर्थ धोंडूतात्या महाराज ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मणराव एकलारे , सचिव बालाजी पिल्लेवाड , पोलीस पाटील नागोराव पाटील , रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड , उपाध्यक्ष सिद्घार्थ सुर्यवंशी , सुनिल हावा, नागनाथ गुट्टे यांची उपस्थिती होती.

यावेळी कोणत्याही प्रकारची गाठ, पु भरलेली जखम, हर्निया हायड्रोसील,(अपेंडिक्स), लघवीचे आजार (मुतखडा प्रोस्टेट), गर्भपिशवी इत्यादीच्या शस्त्रक्रिया, कर्करोग (स्तनाचे, मुख, आतडे आणि लिव्हरचे) आतड्याचे आजार (आम्लपित्त, अल्सर) बध्दकोष्टता मुळव्याध, भगंदर, पायलोनाडल सायतस, फिसर (लेझरद्वारे शस्त्रक्रिया) , मेडिसिन हृदयरोग व किडनी व थायरॉईड, सर्दी, खोकला संबंधित सर्व आजार , दंतरोग निदान उपचार दातांशी निगडीत आजारावर डाॅ. माधव चंबुले, डाॅ सुशिल चंबुले, डाॅ सचिन कापडे यांनी तपासणी व उपचार केले.
श्रीकांत पाटील ,बालाजी मद्रे, दत्ता सोनटक्के, (निळु) मोहन मद्रे ,रमेश मद्देवाड, शिवाजी मद्देवाड ,ओम मद्देवाड, पपन मद्देवाड, कमलाकर वाघमारे, शिवमुर्ती वाघमारे, बापुराव हासरणे, बबन आरदवाड, बबन पिल्लेवाड, रामदास जाधव यांच्यासह श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मंदीर समिती, ग्रामपंचायत विराळ यांनी शिबीर यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
विराळ येथिल आरोग्य शिबीरात वेगवेगळ्या आजार निदान व उपचार करण्यासाठी १३५जनांची रक्त तपासणी करण्यात आली .

चौकट……

डाॅ माधव चंबुले यांनी विराळ गाव घेतले दत्तक

विराळच्या नागरीकांचे आरोग्य राखण्यासाठी विराळचे सरपंच संतोष पवार यांनी ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या मागणीला सकारात्मक घेत डाॅ. माधव चंबुले यांनी विराळ गाव दत्तक घेतले. विराळ गावातील कोणत्याही रोगासाठीचा रुग्ण साई हाॅस्पीटल येथे दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी ,दाखल व उपचार मोफत केले जाणार असल्याचे सांगीतले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!