गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल पो. नि.पुजारी, सपोनी सुनील गायकवाड यांच्यासह तपास अधिकाऱ्यांचा सत्कार

0
गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल पो. नि.पुजारी, सपोनी सुनील गायकवाड यांच्यासह तपास अधिकाऱ्यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे वाढवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेळगाव फाटा ते चाकूर जाणाऱ्या रोडवरील तिरू नदीच्या पुलाखाली एका बंद सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले होते. त्या संदर्भामध्ये वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुरन 230 /25 कलम 103 (1), 238 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नसल्याने मयत महिलेची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत गुंतागुंतीचे झाले होते. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सतत पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनला तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या सूचना आणि आदेशाने लातूर जिल्ह्यातील अनेक कर्तबगार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून या गुन्ह्याचा शोध लावला. अत्यंत तांत्रिक पद्धतीचा वापर करून वाढवणा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ए आय च्या मदतीने मयत स्त्रीचे छायाचित्र बनवून, जिल्हा आणि परिसरातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवून दिले होते. त्याचीही मदत या शास्त्रोक्त पद्धतीने तपास करताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाली. या गुन्ह्यातील मयत महिलेची ओळख पटवली, तसेच तिला जीवे ठार मारणाऱ्या आरोपीताना निष्पन्न केले, व त्यांना गुन्ह्यात अटक करून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
याबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 25 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच या तपास कामी विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आवर्जून सत्कार करून गौरव केला आहे. यामध्ये प्राधान्याने अहमदपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनी भुजबळ, उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बी एल देवकर, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेश कंचे यांचा सन्मान करून पुरस्काराची रक्कम दिली आहे.
उदगीर तालुक्यातील कर्तबगार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाढवणा पोलीस स्टेशनचे कर्तबगार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!