स्व. विजयकुमार मलकलपट्टे स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न

0
स्व. विजयकुमार मलकलपट्टे स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले)महाराष्ट्र राज्याचे माजी उत्पादन शुल्क सहआयुक्त निसर्गप्रेमी तथा शेतिप्रिय असलेले ॲड. विजयकुमार मलकलपट्टे यांच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांच्या अध्यक्षतेखाली व बार्शी सेशन कोर्टच्या न्यायाधीश वैशालीताई रेड्डी,माफसू नागपूरचे सेवानिवृत्त संचालक विस्तार शिक्षण प्रा डॉ अनिल भिकाने,योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्रा. डॉ साधना पन्हाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सदरील सोहळ्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणारे लातूरचे सुपर्ण जगताप , गत चौदा वर्षापासून चला कवितेच्या बनात या व्यासपिठावरून महाराष्ट्रातील
३४५ लेखक ,विचारवंत, शिक्षण तज्ञांची व्याख्याने यशस्वीपणे आयोजित करणारे या उपक्रमाचे संयोजक अनंत माधवराव कदम, उत्तम सेद्रींय शेती करणारे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज शिवराज लंजिले, दामिनी पथकामधून टवाळखोर विद्यार्थ्यावर वचक व दरारा निर्माण करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाताई चंद्रपाल दंडिमे, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका, गायिका,प्रेरणादायी वक्त्या
वर्षाताई ज्ञानोबा मुस्कावाड,
इनर व्हिल क्लब च्या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना,विद्यार्थ्यांना व स्त्रियांना मदत करणाऱ्या मीराताई माधवराव चंबुले व ग्रामविकासाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानीत नागतिर्थवाडीच्या सरपंच कोमल राजकुमार गुणाले आदी मान्यवरांना विजयकुमार मलकलपट्टे स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.सदरील कार्यक्रमात डॉ. भिकाने यांचा सेवापुर्ती बद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच अंबेजोगाई येथील ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा कमलताई बरुरे , न्यायाधिश पदी निवड झाल्याबद्दल वंदना चामले व ज्येष्ठ पत्रकार अंबांदास आलमखाने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आर्यभट्ट मलकलपट्टे यानी सामाजिक कार्यासाठी जिव्हाळा ग्रुप ,चला कवितेच्या बनात व सुपर्ण जगताप याना प्रत्येकी १५ हजार रुपयाची मदत केली. प्रा पन्हाळे, डॉ भिकाने व मुडपे यानी आपल्या भाषणात विजयकुमार मलकलपट्टे यांच्या चौफेर कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रमाकांत बनशेळकीकर तर आभार प्रदर्शन संजिव चामले यानी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यभट्ट व तृष्णाताई मलकमपट्टे , देविदासराव नादरगे, विठ्ठलराव फुलसे ,अरुणा भिकाने यानी परिश्रम घेतले कार्यक्रमास विश्वनाथराव माळेवाडीकर, डॉ अशोक दारनुळे , नवनाथ पाटील , शिवमुर्ती भातांब्रे , डॉ स्वाती गुरुडे सह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!