दिव्यांग मुलांची तपासणी शिबिर संपन्न

0
दिव्यांग मुलांची तपासणी शिबिर संपन्न

उदगीर (एल पी उगीले)
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या अंतर्गत द तालूका विधी सेवा समिती, उदगीर, उपजिल्हा सामान्य रूगणालय, उदगीर, तहसील कार्यालय, उदगीर व पंचायत समिती कार्यालाय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने जिवन विकास मतिमंद कर्मशाळा, कौळखेड ता.उदगीर याठिकाणी दिव्यांग मुलांची ओळख व तपासणी साठी शिबिर घेण्यात आले. सदरील शिबिरास डी. बी. म्हालटकर, जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर व वाय. बी. गमे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर व तसेच के. ए.यादव, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर, उदगीर व बी. आर. झेंडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, उदगीर पी.एम. सुरळकर, गटविकास अधिकारी, उदगीर व आनंद मुंढे, अध्यक्ष तालाका विधिज्ञ संघ, उदगीर एम.के. मळगे, विधिज्ञ, सागर बिरादार विधिज्ञ, एम.टी. वाघमारे, गटविकास विस्तार अधिकारी पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय उदगीर चे महसूल अधिकारी श्रीमती तिडके व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय लातूरचे सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे सदरील शिबिरास वरील मान्यवर उपस्थित होते.
सदीरल शिबिरास उपजिल्हा सामान्य रूग्णालय, उदगीर मुलांची तपासणी साठी वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. डॉ.अजय महिंद्रकर, अस्थिरोगतज्ञ, डॉ. बावगे, डॉ. हरिदास, डॉ. सईद शेख, डॉ. अहमद शेख डॉ. कुंभार, डॉ. जाधव, डॉ. शिदि, अर्चना विदि यांची संपूर्ण टिम यांनी दिव्यांग मुलांची तपासणी व ओळख केली. सदरील शिबिरा मध्ये एकुण ९४ दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली. तसेच सदरील शिबिर हे जिवन विकास मतिमंद कर्मशाळा, कौळखेड ता.उदगीर जि.लातूर येथे संपन्न झाले असून सदर मतिमंद कर्मशाळाचे व्यवस्थापकीय अधिक्षक राजापटेल अब्दुल मलिक व तसेच त्यांचे संपुर्ण सहकारी व सेवाभावी संस्थेचे रविकिरण बेलकुंदे यांचे सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी अमुल्य योगदान लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!