शिवाजीराव हुडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, काँग्रेसमध्ये नवचैतन्य
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच सभासदांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी गटातील काहींनी आक्षेप नोंदवून या पाच संचालकांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली होती. उपनिबंधक व जिल्हा निबंधकांनी या संदर्भात या पाच संचालकांच्या विरोधात निकाल दिल्याबद्दल शिवाजीराव हुडे हे उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याबद्दल काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिवाजीराव हुडे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा समजला जात आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून आता शिवाजीराव हुडे हेच राहणार असल्याने व्यापाऱ्या मधूनही आनंद व्यक्त केला जात आहे.
