प.पू.कुमारस्वामी प्रार्थना मंदिरामध्ये योग वर्गाची सुरुवात.
उदगीर (एल पी उगीले) येथील प.पू. कुमारस्वामी प्रार्थना मंदिर व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक योग शाखा व योग शिबिराचे उद्घाटन योगगुरु डॉ.सग्रांम पटवारी व माजी आमदार मनोहरावजी पटवारी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील एक महिन्या पासुन या ठिकाणी अशोकराव पाटील, शिवकुमार शिरगिरे ,रमेश पाटील, धनराज बिरादार,उमाकांत अंबेसंगे ,
विरभद्र कप्पिकेरे यांनी या योग शाखेचा सुरुवात केली. सर्वांसाठी या योग शाखेचा शुभारंभ करण्यात आला.प्रा. श्रीराम चामले यांनी योग प्रात्यक्षिक, प्राणायाम घेऊन सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम महान तपस्वी प.पू. कुमारस्वामी जी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर लगेच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सग्रांम पटवारी यांनी योग साधने मध्ये महर्षी पतंजली यांनी प्रतिपादित केलेल्या अष्टांग योगाची सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती उपस्थित सर्व योगासाधकांना दिली. योगसाधना ही फक्त अनुभवायची गोष्ट आहे, योगसाधना माणसं जोडण्याची बाब आहे. योगसाधना स्वतःला षडविकारातून मुक्त करण्याची बाब आहे. याबद्दल त्यांनी अतिशय विस्तृत आणि सखोल असे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार,ध्यान, धारणा, आणि समाधी यातील प्रत्येक पायऱ्यां चे सुंदर असे विश्लेषण केले. अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
महान तपस्वी प.पू. कुमारस्वामी यांनी आपल्या आयुष्यामध्ये ध्यानधारणा आणि योगावर भर दिलेला होता, तोच एक धागा पकडून माजी आमदार मनोहरराव पटवारी यांनी प.पू.कुमारस्वामीजींच्या कृपेने स्वामीजींच्या या तपोवन मध्ये या सभागृहामध्ये प.पू. रामदेव बाबा यांच्या योगसाधने ची सुरुवात होते आहे. याबद्दल त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. लागेल ती मदत देण्याचे आश्वासन मनोहरराव पटवारी यांनी सर्व उपस्थिताना केले. स्वामी रामदेवजी आणि प.पू.कुमारस्वामीजी यांच्यातील साधर्म्य म्हणजे योग, यावर त्यांनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले.सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, सर्वांना स्वास्थ्य लाभावे. याबाबतीत त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ. संग्राम जी पटवारी यांनी सर्वांना नियमितपणे योग करण्याचा सल्ला यावेळी दिला. त्याचप्रमाणे हा योगवर्ग सातत्याने चालू राहावा, यासाठी त्यांनी सर्वच योग शिक्षकांना आवाहन केले आहे. याप्रसंगी श्रीमती भगवती टवाणी, अशोकराव पाटील, राजकुमार पाटिल ,प्रतापराव रोडगे, उमाकांत अंबेसंगे,
भुसागरे सूर्यकांत, नारायण पाटील ,नरेंद्र येंदे, रमेश पाटील टाकळीकर, शिवकुमार शिरगिरे ,प्रा.श्रीराम चामले, कप्पिकेरे विरभद्र,सुभाष,नारायण पाटील, माधवराव बिरादार, विजयकुमार सज्जनशेट्टे,बालाजी शेळके,बस्वराज स्वामी, डॉ. शिवकुमार पाटील ,सुधाकर फड, सुभाष ऐनिले,सुरेंद्र अक्कनगीरे ईत्यादी योगसाधक, योगशिक्षक मोठ्या पावसातही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.सुरेन्द अक्कनगिरे यांनी आभार प्रदर्शन केले.
