तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल व पिकांचे मोठे नुकसान, तातडीच्या दुरुस्तीची काँग्रेसची मागणी

0
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल व पिकांचे मोठे नुकसान, तातडीच्या दुरुस्तीची काँग्रेसची मागणी

लोकनेता न्यूज नेटवर्क
उदगीर (एल पी उगीले): तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल तसेच खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नागरिकांच्या जीवितासह शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, उदगीर यांना स्वतंत्रपणे निवेदने देऊन तातडीने पुलांची दुरुस्ती व शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली.
सदरील निवेदन हे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जय जवान अभियान चे समन्वयक विवेक पंडितराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श पिंपरे, तसेच सद्दाम बागवान, शरीफ शेख, सादिक सय्यद यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील पाहणी करण्यात आली असता, अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात भाकसखेडा पश्चिम–पूर्व रस्त्यावरील पुल वाहून गेला.,गंगापूर–भाकसखेडा रस्त्यावरील पुलाजवळील रस्त्याखालची माती वाहून गेली., सताळा येथे वायगाव–सुमठाणा नदीवरील पुलाजवळचा बांध फुटला.
४शंभु उमरगा–सताळा पानंदरस्त्यावर पुल वाहून गेला.,करडखेल गावाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा पुल वाहून गेला.,या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामा करून अंदाजपत्रके तयार करून तातडीने पुलांची दुरुस्ती व बांधकाम कार्य सुरू करण्याची मागणी करण्यात आली.तसेच, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही पाहणीतून स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी आजही पिकांमध्ये पाणी साचले असून शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पादन धोक्यात आले आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे व आत्महत्यांचा धोका नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
शासनाकडे युवक काँग्रेसच्या वतीने महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत, १००% पिकविमा वाटप तातडीने करण्यात यावे.,शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.,आणेवारी काढताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्लॉटला प्राधान्य द्यावे.,पिकविमा योजनांमध्ये सुधारणा करून लाभ वेळेत व विनाअडथळा मिळावा.,शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनांद्वारे शासनाला तातडीने मदत, कर्जमाफी व रस्ते–पूल दुरुस्तीबाबत आवश्यक ती पावले उचलण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!