आरोग्य शिबीरातुन गरजु रुग्णांना नवसंजिवनी मिळते – आ.संजय बनसोडे

0
आरोग्य शिबीरातुन गरजु रुग्णांना नवसंजिवनी मिळते - आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) स्त्री ही कुटुंबाचा आधार असून, समाजात तिचे आरोग्य आणि सवयी भावी पिढीसाठी महत्त्वाच्या ठरतात. भारतीय समाजात स्त्रियांना विविध रुपात बघितले जाते. स्त्रीयांच्याही जीवनात शिक्षण आणि सक्षमीकरणामुळे त्यांच्यात बदल घडत आहेत, आणि त्यांना अधिक संधी मिळत आहेत. आपल्या कुटूंबात स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते. तिच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कारण आपल्या घरातील स्त्री निरोगी तर कुटुंब निरोगी असते. सामान्य रुग्णालयाने आयोजीत केलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातुन गरजु रुग्णांना नवसंजिवनी मिळत असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयात आयोजीत “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व सर्व रोग निदान’ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.प्रदीप ढेले, वैद्यकिय अधिक्षक डाॅ.पी.के. दोडके,डाॅ.दत्तात्रय पवार, डाॅ.अशोक सारडा, डाॅ.मोनिका पाटील, प्रा.श्याम डावळे, धनाजी मुळे, बाळासाहेब पाटोदे, चंद्रकांत टेंगटोल, अभिजीत औटे, सतिश पाटील, उर्मिला वाघमारे, डाॅ.दिपक लांडे, डाॅ.संजय भोसले, डाॅ.प्राची हरिदास, डाॅ.अजय महिंद्रकर, डाॅ.विद्या गुरुडे, डाॅ.मेघश्याम कुलकर्णी, डाॅ.प्रीती बादाडे, डाॅ.धिरज देशमुख, डाॅ.बळीराम सोनवणे, डाॅ.सईद शेख, डाॅ.बस्वराज स्वामी, सचिन पंडित आदी उपस्थित होते
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, उदगीर शहरातील सामान्य रुग्णालय हे सामान्य रूग्णांना सेवा देण्यासाठी उभारण्यात आले असुन या ठिकाणी सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून रुग्णांना वेळेवर सेवा देण्याच्या सुचना दिल्या. रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेवुन या ठिकाणच्या उपलब्ध सुविधा व औषधाचा पुरवठा, कर्मचारी व डाॅक्टर यांची रिक्त पदे यांचा आढावा घेवुन या सामान्य रुग्णालयाला सर्व सोई सुविधा पुरवणार असल्याचेही आ.बनसोडे यांनी सांगितले.
सामान्य रुग्णालयात आलेला रुग्ण योग्य उपचार घेवुन वेळेत बरा व्हावा. यासाठी येथील वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी मेहनत घ्यावी.
लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून उदगीरची ओळख आहे. त्यामानाने आपल्या सामान्य रुग्णालयात दररोज ओपीडींची संख्या मोठी असून भविष्यात रुग्णांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, नागरीक व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!