बनावट दारू विकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले !!

0
बनावट दारू विकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले !!

राज्य उत्पादन शुल्काच्या कर्तबगार अधिकाऱ्यामुळे अटकच झाले !!

उदगीर (ॲड. एल. पी. उगीले)
व्यसनाधीन लोकांना स्वस्तामध्ये नशा विकण्याचा धंदा काही लोक करू लागले आहेत. प्रथमदर्शनी हुबेहूब कंपनीची बनवलेली दारू वाटावी, अशा पद्धतीची मात्र बनावट दारू बनवून ती विक्री करून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न काही लोक पाहत होते. मात्र या अनुषंगाने चर्चा होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता विभागाचे प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी.एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत तसेच उप अधीक्षक एम जी मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळवून मिळालेल्या माहितीची खात्री करून बनावट देशी मद्याचा साठा असल्याचे समजल्याने मौजे किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील एका संशय इसमास राहत्या घरी छापा टाकला असता, देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या 90 मिली क्षमतेच्या बाराशे बॉटल आढळून आल्या. सदरील बॉटल्स प्रथम दर्शनी बनावट मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत 246 /25 दिनांक 15 सप्टेंबर रोजी दाखल करून, सदर इसमास जागीच अटक करण्यात आली. त्यानंतर दिनांक 21 सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्याच्या पुढील तपासकामी किनगाव परिसरात या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेतला असता, किनगाव येथे एक आरोपीस अटक करून आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यानंतर मौजे सांगवी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर शिवारातील एका ढाब्यावर छापा टाकला असता, तेथे देशी दारू भिंगरी संत्रा 180 मिली क्षमतेच्या 38 बॉटल्स मिळून आल्या. ज्या की प्रथमदर्शनी बनावट असल्याच्या दिसून येत होत्या. त्याची रक्कम तीन हजार 40 चा मुद्देमाल जप्त करून फरार धाबा मालकास 23 सप्टेंबर रोजी अहमदपूर शहरातून अटक करण्यात आली. सदर गुन्हा रजिस्टर नंबर 246/ 25 मध्ये एकूण पाच आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक चार चाकी वाहनासह एकूण मुद्देमाल किंमत आठ लाख 71 हजार 40 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चाकूर विभागाच्या निरीक्षक श्रीमती यु व्ही मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर. यम. माकोडे, एस आर राठोड, एस के वाघमारे तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग निलंगा विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.डी. घुले, एस पी काळे, तसेच राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक लातूर विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही एस पवार, डी एच आशमोड, एस पी मळगे तसेच जवान सर्वश्री ए. ए देशपांडे, बी वाय गायकवाड, बी एस साखरे, आर एस चिंचोलीकर, व्ही डी गायकवाड, व्ही एस सुडके, एस जी गड्डीमे, ये वानखेडे, एस राठोड तसेच जवान वाहनचालक फडणीस यांनी सहभाग नोंदविला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर एम माकोडे चाकूर विभाग हे करत आहेत.

चौकट…….

केशव राऊत यांचा कार्यकाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची शान वाढवणारा …..

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक म्हणून केशव राऊत यांच्या कार्यकाळात अत्यंत उत्कृष्टपणे कार्य केले जात असून बनावट व रसायन मिश्रित दारू बनवणाऱ्या कारखान्यावर धाडी टाकल्या, तसेच मोठ्या प्रमाणावर धाब्यातून विक्री होणाऱ्या बनावट आणि विषारी दारूच्या विरोधात कठोर कारवाई करून अशा अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीची कामगिरी करण्यासाठी या विभागाचे जिल्हा अधीक्षक केशव राऊत यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन लाख मोलाचे असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्य केल्यास निश्चितपणे अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल. अशी चर्चा आता जनतेतून सुरू आहे.

चौकट……

अवैध दारू चे केंद्रस्थान म्हणजे धाबे !!

सध्या परमिट रूम आणि बियर बार मध्ये दारू वर टॅक्स वाढल्यामुळे दारू महाग मिळते असे सांगून धाबेवाले आपल्याकडे अवैध पद्धतीने साठा करून बनावट दारू ठेवून, ती स्वस्तामध्ये विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्रीला चालना मिळत आहे. ही गोष्ट लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धाब्यावरूनही अवैध आणि बनावट स्वरूपातील दारू जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. ही कामगिरी देखील फार मोठी आहे. त्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!