जागतिक स्तरावरील संवाद भाषा म्हणून हिंदीचा लौकिक वाढला – प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी

0
जागतिक स्तरावरील संवाद भाषा म्हणून हिंदीचा लौकिक वाढला - प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी

अहमदपूर ( गोविंद काळे)
हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून ज्ञान, विज्ञान, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करणारी हिंदी आज जागतिक संवादाची माध्यम भाषा म्हणून आपला नावलौकिक वाढवीत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन उपप्राचार्य प्रो.डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयक्यूएसी अंतर्गत हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी पखवाडा ‘ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा तथा साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसानपीठावर उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक हिंदी विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. नागराज मुळे, ह भ प प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सतीश ससाणे आदींची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. चौधरी म्हणाले की, हिंदी भाषा आपल्या देशाची राजभाषा असून ज्ञानस्त्रोताची प्रमुख भाषा आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलनामध्ये हिंदी भाषेचे फार मोठे योगदान होते असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, हिंदी भाषा जन माणसाला जोडणारी जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची भाषा असून जगात तिसऱ्या नंबरची ज्ञानभाषा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने (युनो ने ) हिंदी भाषेला मान्यता दिली आहे. तसेच हिंदीच्या साहित्यातून मानवी जीवनाचे प्रासंगिक चित्रण विविध लेखकांनी केले असून या भाषेचा आणि साहित्याचा फार मोठा इतिहास आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ.नागराज मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सचिन गर्जे यांनी व आभार डॉ. प्रकाश चौकटे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!