प्रत्येक मूलं हे अद्वितीय,अतुलनीय आहे.सचिन मालू यांचे प्रतिपादनसंत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

0
प्रत्येक मूलं हे अद्वितीय,अतुलनीय आहे.सचिन मालू यांचे प्रतिपादनसंत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न
  अहमदपूर ( गोविंद काळे ) प्रत्येक मुलं हे युनिक आहे. एकमेकांची तुलना करू नका.पालकांनी त्यांचा मित्र बना असे प्रतिपादन 

लातूर येथील सुमन संस्कार केंद्राचे संचालक तथा समुपदेशक सचिन मालू यांनी केले.
ते दि. 28 रोजी सानवी मंगल कार्यालय येथे आयोजित संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य रेखाताई तरडे पाटील, सिनेटचे सदस्य एडवोकेट निखिल कासनाळे, ज्ञानोबा भोसले, उद्योजक जय भुतडा,कुलदीप हाके, शिवालिका हाके, शंकर भालके, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विद्याधर मुसळे, बालाजी हडोळतीकर, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या पाल्यांना क्वालिटी टाईम द्या. सकारात्मक बोला. त्यांच्यासोबत छोटे छोटे खेळ खेळा. अनुभवातून मुलांना शिकू द्या.
यावेळी पालक दिनेश मोरे, किलबिल चे संचालक ज्ञानोबा भोसले, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, प्राचार्या रेखाताई हाके-तरडे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप गणेश दादा हाके पाटील यांच्या भाषणाने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. वक्त्यांचा परिचय अश्विनी घोगरे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सतिश साबणे व शारदा तिरुके यांनी केले तर आभार मीना तोवर यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!