जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल सर्वेश होनराव चा सत्कार
उदगीर(प्रतिनिधी) लातूर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत सर्वेश दत्ताहरी होनराव हा फ्री स्टाईल शंभर मीटर, 400 मीटर व 800 मीटर या तिन्ही स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल स्विमिंग ग्रुप उदगीरच्या वतीने जयवंतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अवलकोंडा येथील तलावात हा स्विमिंग ग्रुप दररोज सकाळी स्विमिंग करतो. लातूर येथील संत तुकाराम जलतरणिकेत जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कजगावडे,कृष्णा केंद्र व निळकंठ हिंबाळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडल्या. या जलतरण स्पर्धेत श्यामलाल स्मारक विद्यालय उदगीर येथे इयत्ता नववीत शिकत असेला सर्वेश दत्ताहरी होनराव हा फ्री स्टाईल शंभर मीटर,400 मिटर व 800 मीटर या तिन्ही स्पर्धेत प्रथम आला. तसेच तो पाचवी व आठवी स्कॉलरशिप होल्डर आहे. आता शाळेत वर्गात प्रथम आल्याबद्दल व जलतरण स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल शाळेनीही सत्कार केला. या स्विमिंग ग्रुप च्या वतीने अभिनंदन करुन प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी विवेक होळसमुद्रे, बोळेगावे, सुर्यकांत अंबेसंगे, गोविंद रंगवाळ, सोनवणे , माधव पावडे , प्राचार्य ॲड नावंदर, विवेकानंद उगीले , कछवे, डॉ. बालाजी महाळंकर , रावसाहेब औरादे, राजुरे सावकार ,भय्या होळसमुद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
