श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

आलमला (प्रतिनिधी) : श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालय आलमला तालुका औसा जिल्हा लातूर या विद्यालयाने एच एस सी बोर्ड परीक्षा 2021 चा शेकडा शंभर टक्के निकाल दिला असून कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून पीक शास्त्र या अभ्यासक्रमाची कुमारी पवार आरती 80 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे तर कुमारी समशेट्टे शिवानी 79 टक्के गुण घेऊन महाविद्यालयात द्वितीय आली आहे तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून चिरंजीव तांबोळी सोहेल हा 79 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या व्यवसाय अभ्यासक्रमातून पठान हुसेन खा 73 टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तसेच पीक शास्त्र व्यवसाय अभ्यासक्रमातून कुमारी कुंभार अंकिता व केशवे ज्ञानेश्वर हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेतून कुमारी कांबळे धरती 76 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे तसेच खिचडे योगेश 76 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण आहे रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखून विद्यालयाचा सर्वत्र नावलौकिक केला आहे म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अडवोकेट उमेश पाटील उपाध्यक्ष सोपान काका अलमलेकर सचिव प्राध्यापक जीएम धाराशिवे सहसचिव प्रभाकर कापसे कोषाध्यक्ष चनबसपा निलंगेकर संस्थेचे सर्व संचालक मंडळ तथा प्राचार्य सौ अनिता पाटील पर्यवेक्षक श्री आवटे ए आय व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

About The Author