श्री केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल

श्री केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल

५४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर येथील श्री केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून ५४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील दोन विद्यार्थिनी ९०.१६ टक्के गुण मिळवून प्रथम आल्या आहेत.54 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. श्री केशवराज उच्च माध्यमिक विद्यालयातील एकूण ५७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान प्रगती चव्हाण व प्राजक्ता फुलारी या दोन विद्यार्थिनींनी पटकावला आहे.दोघींनाही ९०.१६ टक्के गुण मिळाले.वेदांत सांगवीकर ८९.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्रथमेश हरिदास ८९.१६ टक्के, हर्षल इंगळे ८९.१६ टक्के,दयानंद जोगदंड ८९.१६ टक्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह नितीन शेटे,सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, विद्यासभेचे अध्यक्ष किरणराव भावठाणकर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष जितेश चापसी, केशवराज माध्यमिकचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील वसमतकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author