लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

0
लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

उदगीर (एल पी उगीले): लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा उदगीर येथील भगीरथ मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीर हावगीस्वामी मठाचे शंभुलिंग शिवाचार्य महाराज, मुखेडचे विरुपक्ष शिवाचार्य महाराज, ह भ प. शिवराज नावंदे गुरुजी, ह.भ प. उद्धव हैबतपुरे महाराज, वैशालीताई स्वामी, लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून वधू-वर व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी लिंगायत महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, भीमाशंकर शेळके, शहर सरचिटणीस लक्ष्मण भालके, अशोक शेटकार, प्रा. पंडित देवशेट्टे, शिरीष रोडगे, राजकुमार वडले, संजय शिवशेट्टे, संघशेट्टी बिरादार, बापूराव शेटकार, अशोक कडोळे, लक्ष्मण रोडगे, शिवराज रंडाळे, सौ. चंद्रकला शेटकार, यशवंत पटवारी, दिलीप सांगवे, सूर्यकांत शिरसे तसेच धाराशिव जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, उपाध्यक्ष वैजनाथ झट्टे, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय बिरादार, बसवराज बिडवे , यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुढील मेळावा हा जानेवारी महिन्यात तुळजापूर येथे घेण्याचे धाराशिव चे जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी सांगितले. जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!