महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

अर्धापूर (प्रतिनिधी) :- पोलिस ठाणे अर्धापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या अर्धापूर तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार उध्दवराव सरोदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व पत्रकार संघाचे पदाधिकारी वली मोहम्मद खतिब, बिबीशन कांबळे, ॲड.गौरव सरोदे,छाया चित्रकार राजेश पळसकर आदिंचे अभिनंदन करून यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम,सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णुकांत कऱ्हाळे,सहाय्यक पोलिस निरीक्षक ढेमकेवाड,पोलिस महेंद्र डांगे आदि उपस्थित होते.याचबरोबर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी कळसूबाई शिखर सर करून त्याठिकाणी त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अर्धापूर तालुकाध्यक्ष उध्दव सरोदे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!