सरस्वती विद्यालयामध्ये एक हजार वृक्षरोपांचे वाटप

0
सरस्वती विद्यालयामध्ये एक हजार वृक्षरोपांचे वाटप

लातूर (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय खाडगाव प्रकाश नगर लातूर येथे दि.29/09/2025 रोजी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत सरस्वती विद्यालय खाडगाव, प्रकाश नगर व वसुंधरा प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १००० वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने व स्वागतगीताने झाली. स्वागतगीताचे सादरीकरण श्रीमती फुंदे मॅडम व त्यांच्या बालचमुने केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. बाबासाहेब काशीराम सूर्यवंशी सर, अध्यक्ष बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर, प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. राहुलकुमारजी मीना साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर) तसेच मा.अॅड.एल.ई. भागवत सर (सचिव, बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर) प्रा. योगेश शर्मा, संस्थापक अध्यक्ष वसुंधरा प्रतिष्ठान लातूर, डॉ. अजित चिखलीकर .अध्यक्ष वसुंधरा प्रतिष्ठान लातूर, मा.श्री. चंद्रकांत काशिनाथराव साळुंके (अध्यक्ष शालेय समिती व उपाध्यक्ष, बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर) मा.श्री.चंदूभाऊ साळुंके (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती लातूर) मा.श्री. एच. एस. गवळी, मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय लातूर, मा.श्री. प्रशांत माने उपमुख्याध्यापक सरस्वती विद्यालय लातूर, तसेच पर्यवेक्षक श्री राठोड सर व श्री मानकोसकर सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण मा.श्री. चंद्रकांत साळुंके सरांनी केले. यानंतर मा. मा.श्री. राहुलकुमारजी मीना साहेब यांनी आपल्या मनोगतात वृक्षो रक्षति: वृक्ष:| या संस्कृत उक्तीप्रमाणे वृक्षांचे जतन करा, वृक्ष आपले रक्षण करतील. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन सोडतात म्हणून झाडे हे आपले श्वास आहेत म्हणून प्रत्येकाने एकतरी झाड लावलेच पाहिजे असे म्हणाले.
या उपक्रमात मोलाचे योगदान दिल्याबद्दल विद्यालयातील सहशिक्षक श्री शिवशंकर स्वामी सर व श्री मुकेश लाटे सर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप श्री. बाबासाहेब सूर्यवंशी सरांनी केला तर आभार प्रदर्शन मा.श्री. एच. एस. गवळी सरांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!