शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ‘बालाजी अवतरला’ गीताचे अनावरण!

0
शिरूर ताजबंद येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 'बालाजी अवतरला' गीताचे अनावरण!

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे )​तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ‘बालाजी अवतरला’ या विशेष गीताचे अनावरण करण्यात आले. दत्ता जवळगे यांच्या संकल्पनेतून हे भक्तिगीत साकारण्यात आले आहे.
​या अनावरण सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी उपस्थिती लावली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
​याप्रसंगी साहेबराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, तुकाराम जाधव, विशाल जाधव, विठ्ठल बोडके, मच्छिंद्र वाघमारे, विशंभर पाटील काळेगावकर, (संकल्पनाकार) दत्ता जवळगे, प्रा. दत्तात्रय माने, बाबुराव सैदापूरे, सुभाष गुंडरे, गोविंद कापसे, श्रीधर पोतदार, भाऊसाहेब शेळके आणि शिरूर ताजबंद गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने शिरूर ताजबंद येथील सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाला एक नवी कलाटणी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!