श्यामलाल स्मारक विद्यालयाचा सर्वेश होनराव जलतरण स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

0
श्यामलाल स्मारक विद्यालयाचा सर्वेश होनराव जलतरण स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

उदगिर (प्रतिनिधी): येथील श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सर्वेश होनराव हा जलतरण स्पर्धेत 100 मी., 400 मी. व 800 मी. या तीनही प्रकारात जिल्ह्यात प्रथम आला असून त्याने विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्वेश होनराव व त्याचे पालक यांचा विद्यालयात सत्कार केला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सर्वेशने संस्थाध्यक्ष सुपोषपाणि आर्य ,त्याचे वर्गशिक्षक अविनाश घोळवे तसेच क्रीडाशिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक यांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले असून श्यामलाल विद्यालयात नेहमी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, या शाळेत मी शिकतो याचा मला अभिमान असल्याचे सांगितले. त्याच्या या यशाबद्दल श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणि आर्य , उपाध्यक्ष गिरीषजी मुंडकर,सचिव ॲड. विक्रमजी संकाये, सहसचिव अंजुमणिताई आर्य, संस्थेचे सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहुल लिमये, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!