सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठीमोफत शिबिरात योगदान – डॉ. माधव चंबूले
हेर येथील मोफत शिबीरात ५३० रुग्णांची तपासणी व औषधोपचार
उदगीर (एल पी उगिले) गेल्या तब्बल 22 वर्षापासून उदगीर परिसरातील आणि सीमा भागातील रुग्णांची सेवा करत असताना या परिसरातील जनतेने आपल्यावर जीवापाड प्रेम केले. आपला मान सन्मान वाढवला. आता आपण सुखी समाधानी असून उर्वरित आयुष्य हे गोरगरिबांच्या आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणे आणि शक्य असेल तशी मदत करणे यासाठीच खर्ची घालण्याचा निर्धार उदगीर येथील उदयगिरी मल्टीसशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख तथा ख्यातनाम सर्जन माधव-चंबुले यांनी व्यक्त केले. ते साई चारिटेबल ट्रस्टच्या साई हॉस्पिटल आणि उदयगिरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने उदगीर तालुक्यातील विविध गावात मोफत आरोग्य निदान व औषधोपचार वाटप शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते.
उदगीर तालुक्यातील हेर येथील नवरात्र महोत्सव निमित्त साई हाॅस्पीटल उदगीर यांच्या वतीने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यात ५३० रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले.या शिबीरात रक्त तपासणी,ईसीजी आदीसह इतर सेवा मोफत देण्यात आली.डाॅ माधव चंबुले, डॉ सचिन कापडे, डॉ संजय सांडोळकर, डॉ सुशील चंबुले, डॉ पुजा चंबुले इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी सर्जरी ,दंत व मुख रोग,किडनी रोग व कॅन्सर आदी आजारांची तपासणी केली, तर राहूल नादरगे यांच्या श्रेया मेडिकलच्या वतीने मोफत औषध- गोळ्या देण्यात आल्या.या शिबीरात दोनशे रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.यावेळी दत्ता याले, विश्वजीत नादरगे, ॲड. एल.पी. उगीले,उपसरपंच तुळशिराम बेंबडे,बाबासाहेब पाटील,माजी चेअरमन दिलीप बिरादार, माजी सरपंच गोविंद कोंपले,भागवत गुरमे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मिटकरी,शाम गुरमे,विजय माने,राहूल नादरगे, बाबुराव कल्याणी, रणजीत कांबळे,तातेराव नादरगे आदीनी परिश्रम घेतले.
पुढे बोलताना डॉ. माधव चंबूले म्हणाले की, समाजसेवेचा विचार डोक्यात घेऊन काम करत असताना गोरगरिबांची मुले डॉक्टर झाल्यानंतर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उदगीर परिसरात महाराष्ट्रातील अव्वल ठरेल अशा पद्धतीचे नागेश रेड्डी यांच्या प्रमाणे सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणारे तसेच श्रीमंतांना देखील दर्जेदार दर्जेदार पद्धतीने सेवा देणारे अद्यावत हॉस्पिटल उभारण्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला आहे. अत्यंत दर्जेदार सेवा आणि कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल? याचा प्रत्यक्ष अभ्यास करून मोठे हॉस्पिटल आणि यशस्वी हॉस्पिटल प्रत्यक्षात करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. सामाजिक जाणीवा जपण्यासाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न इतरांनीही आदर्श घ्यावा असे आहेत. एक शेतकऱ्याचा मुलगा ते आदर्श सर्जन आणि आता आदर्श समाजसेवक अशा पद्धतीचा डॉक्टर चंबुले यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आणि ऊर्जादायी ठरणारा असल्याचे मनोगत डॉक्टर संजय सांडोळकर यांनी व्यक्त केले.
उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दिलीप बिरादार यांनी केले.
