समर्थ विद्यालयाचा कुस्तीपटू विभाग स्तरावर.
उदगीर (प्रतिनिधी): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची कुस्तीपटू १७ वर्ष वयोगटात विभागस्तरावर खेळणार आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा शुक्रवारी श्री गुरुदत्त कुस्ती केंद्र, बोरगाव जि. लातूर येथे खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत संबंधित शाळेचा कुस्तीपटू रणवीर रविप्रकाश याने १७ वर्षे वयोगटात व ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. हा कुस्तीपटू विभागीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे. या यशाबद्दल कुस्तीपटू रणवीर जाधव व क्रीडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांचे तालुका क्रिडाधिकारी सुरेंद्र कराड, संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
