स्वातंत्र्याच्या आदोंलनात खादी वस्त्र नव्हे तर शस्त्र ठरली – रंगा राचुरे

0
स्वातंत्र्याच्या आदोंलनात खादी वस्त्र नव्हे तर शस्त्र ठरली - रंगा राचुरे

उदगीर (एल पी उगीले) येथील जिव्हाळा ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरीक संघाचे विरंगुळा केंद्रात माजी आ. प्रा. मनोहरराव पटवारी यांच्या अध्यक्षते खाली प्रख्यात समाजवादी विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे यांचे ‘ न उमगलेली गांधी’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. याप्रसंगी व्यासपीठावर जिव्हाळा ग्रुपचे सचिव डॉ अशोक दारनुळे, सत्कार मुर्ती शरणप्पा खेळगे व लक्ष्मीबाई वाघमारे उपस्थित होते.
रंगा राचूरे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले की, गान्धीजीनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अहिंसा व सत्याग्रहाचा मार्ग अवलंबिला गेला. त्यांनी शांततापूर्ण मार्गाने ब्रिटिश सरकारचा कायदेभंग केला. गांधीजीनी स्वदेशीची चळवळ राबवण्यासाठी खादीचा वापर केला. त्यामुळे खादी वस्त्र नव्हे तर ते शस्त्र झाली. संयुक्त राष्ट्र परिषदेने दोन ऑक्टोबर हा दिवस जागतिक शांतता व अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यामुळे गांधी विचारधारेला जागतिक मान्यता मिळाली. सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला व जगातील अनेक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले. काही वर्षानंतर गांधी म्हणजे अद्भुत चमत्कार असे म्हंटले जाईल. त्यांनी गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरयुक्त संबंधावर प्रकाश टाकला. तसेच भारत- पाक फाळणी ची कारणमिमांसा केली.
अध्यक्षीय समारोप करताना माजी आ. प्रा. मनोहर पटवारी म्हणाले की,
गांधीजींनी सर्व धर्म समभावनेचा दिलेला संदेश आचरणात आणून जातीयता व धर्मांधता नष्ट करून देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमेची पूजन व विठ्ठलराव फुलसे यांच्या गांधी वंदना गीताने झाली. विश्वनाथ मुडपे यानी खादी वस्त्र व स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले.ज्येष्ठ नागरिक शरणाप्पा खेळगे गुरुजी व चाळीस वर्षापासून सतत सुत कताई करणाऱ्या ज्येष्ठ महिला लक्ष्मीबाई पंढरीनाथ वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले. रमाकांत बनशेळकीकर यांनी सूत्रसंचालन तर डॉ अशोक दारनुळे यानी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिव्हाळा ग्रुपचे मार्गदर्शक विश्वनाथराव बिरादार, देविदासराव नादरगे, सहसचिव नवनाथ पाटील, कोषाध्यक्ष शंकरराव केंद्रे, अमृतराव देशपांडे, सच्चीदानंद पुठ्ठेवाड , चंद्रकांत रोडगे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीक संघांचे प्रा. रमाकांत मध्वरे, प्रा. श्रीराम चामले, मुरलीधर जाधव, मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रा. एस एस पाटील, प्रा. प्रवीण जाहुरे, मसापचे धनंजय गुडसूरकर, बलुतेदार
संघटनेची सुधाकर दापकेकर,
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राचार्य विजयकुमार पाटील, अरुणाताई भिकाने, जिव्हाळा ग्रुपचे सोपानराव माने, शंकरराव साबणे , हावगीराव आचारे , मोहनराव खिंडीवले, दिलीप कंधारे , पांडूरंग बोडके, लक्ष्मीकांत बिडवई यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!