कासार सिरसी येथे माहा ऑनलाइन सी ए सी सेंटर मध्ये नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची लूट
जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने लूट करत असलेल्या सीएसी सेंटरचे परवाने रद्द करून कार्यवाही करण्याची तहसीलदारांना निवेदन
कासार प्रतिनिधी :– बालाजी मिलगीरे
कासार सिरसी येथे असलेल्या सीएसी सेंटर मध्ये शासनाद्वारे प्राप्त करण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रे काढावे लगत असतं त्यामध्ये नॉन क्रिमिनल उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे अनेक कागदपत्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि वैयक्तिक नागरिकांच्या कामासाठी अत्यावश्यक असून ते काढण्यासाठी पालकांना सीएससी सेंटरला जावं लागत असत ते प्रमाणपत्र काढून देण्याकरिता म्हणून शासनाने नेमून दिलेल्या रक्कमेपेक्षा चौपट पैसे घेऊन दिले जात आहे ही लूट जय मल्हार क्रांती संघटनेच्या निर्देशनात आल्याने येथे सुरू असलेल्या सर्व सीएसी सेंटरची चौकशी करून त्या सीएसी सेंटरची परवाने रद्द करून संबंधित संचालकावर कायदेशीर कारवही करण्यात यावी अशाप्रकारे लेखी निवेदन निलंगा येथील माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की कासार सिरसी येथील ऑनलाईन सीएसी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी लागत असलेल्या तसेच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रे काढण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रति प्रमाणपत्र काढण्यासाठी 70 रुपये पीस घेण्याचे नेमवाली असताना येथील सीएसी बहाद्दर सर्रासपणे प्रति प्रमाणपत्र 300 रुपये प्रमाणे घेत आहेत एवढेच नवे तर लवकर मिळवून देण्यासाठी म्हणून प्रति प्रमाणपत्र 400 रुपये घेऊन विद्यार्थ्यांची पालकांच्या आणि येथील नागरिकांची लूट करत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हाध्यक्ष भास्कर बिराजदार पाटील यांनी स्वतः त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा नॉन क्रिमिनल आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी येथील सरवदे सीएसी मध्ये दिनांक 24/ 9/ 2025 रोजी दिले असता 29 /9/ 2025 रोजी वरील दोन्ही प्रमाणपत्र काढून देऊन त्यांच्याकडून सहाशे रुपयेची मागणी करण्यात आली त्यावेळी एवढे रुपये का असे विचारले असता सीएसी चालक रवी सरवदे यांनी मी तहसील कार्यालय येथे कोतवाल म्हणून कार्यरत आहे हे प्रमाणपत्र लवकर काढून घेण्यासाठी मला संबंधित वरिष्ठ साहेबांना हे पैसे द्यावे लागतात असे म्हणून मला तुम्ही पैसे सहाशे रुपये द्यावेच लागेल अशी मागणी करत अरे रावे ची भाषा करत सहाशे रुपये ची वसुली केली आहे अशाप्रकारे कित्येक नागरिकांचे लूट या ठिकाणी सर्रासपणे केली जात आहे.
म्हणून संबंधित व्यक्ती कोतवाल या पदाचा दुरउपयोग करत असल्याने त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्याची सीएसी सेंटर परवाना रद्द करून त्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर व्यक्तीवर वेळेचा आपल्या कार्यालयाने मार्फत कारवाई नाही झाल्यास संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
