प्रशासनाकडून तातडीची मदत: मन्याड नदीच्या पुरात मयत झालेल्या लहू पोले यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

0
प्रशासनाकडून तातडीची मदत: मन्याड नदीच्या पुरात मयत झालेल्या लहू पोले यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

​अहमदपूर: ( गोविंद काळे) – काही दिवसांपूर्वी मन्याड नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या सुमठाणा येथील लहू पोले यांच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन योजनेंतर्गत प्रशासनाने तातडीने मदत केली आहे.
​उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या हस्ते, लहू पोले यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश (चेक) सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रशासनाने पोले कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
​मन्याड नदीला आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे लहू पोले यांचा मृत्यू झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीत, प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करत शासकीय मदत मिळवून दिली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालून ही मदत लवकरात लवकर कुटुंबापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे संकटकाळात पोले कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
​प्रशासनाच्या या जलद आणि संवेदनशील कृतीबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!